Ad will apear here
Next
विवेकानंद महाविद्यालय दुसऱ्यांदा ठरले 'कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स'
कोल्हापूर : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विवेकानंद महाविद्यालय हे शिवाजी विद्यापीठातील एक गुणवत्ताप्राप्त व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणारे महाविद्यालय आहे. नुकताच या महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) 'कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स' हा दर्जा दिला असून या वर्षी महाविद्यालयाला एक कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. हा दर्जा या कॉलेजला मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. 

भारत सरकारच्या 'डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी'ने यापूर्वीच या महाविद्यालयाचा समावेश 'स्टार कॉलेज'मध्ये केला आहे. तसेच या महाविद्यालयास बेंगळुरू येथील ‘नॅक’कडूनही दुसऱ्यांदा ‘ए’ मानांकन प्राप्त झाले आहे.

महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीबाबत प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर म्हणाले ‘ अधिक गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी हे महाविद्यालय प्रयत्नशील असून शैक्षणिकदृष्ट्या विविध समाजोपयोगी उपक्रम या महाविद्यालयात राबविले जातील. हे महाविद्यालय स्वायत्ततेकडे वाटचाल करीत आहे. 'यूजीसी'च्या व केंद्र शासनाच्या विविध योजनांतून विद्यार्थ्यांना अधिकाधिक सेवासुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.’

‘महाविद्यालयाच्या या यशात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. हे यश संपादन करण्यासाठी संस्थेच्या सचिव प्राचार्य शुभांगी गावडे व संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले आहे,’ असे प्राचार्य होनगेकर म्हणाले. 

या यशाबद्दल कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी प्राचार्य, प्राध्यापक व प्रशासकीय सेवकांचे अभिनंदन केले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZSCBE
Similar Posts
विवेकानंद कॉलेजमध्ये भित्तिपत्रिकेचे अनावरण कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘राजकीय व्यवस्था व विचार’ या विषयावरील भित्तिपत्रिकेचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांचा विकास होण्यासाठी व त्यांच्या
‘विवेकानंद’मध्ये ‘जीएसटी’वरील कार्यशाळा कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेज मध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापीठ व अग्रणी महाविद्यालय क्लस्टर योजने अंतर्गत ‘भारतातील कररचना व जी.एस.टी.’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. पी. एस. कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या हस्ते झाले
‘शिक्षक समाज आणि संस्कृतीचे पालकत्व स्वीकारतो’ कोल्हापूर : ‘अत्यंत त्यागमय भावनेने कष्टाळू वृत्तीने विद्यार्थी घडवणारा शिक्षक समाज घडवत असतो. आज शिक्षणाचे स्वरूप बदलले आहे आणि शिक्षकाच्या कामाचे स्वरूपही बदलले आहे. शिक्षण संस्था व्यावसायिक झाल्या आहेत आणि शिक्षकाच्या व्रतस्थपणाचेदेखील व्यावसायिक पेशात रूपांतर झाले आहे. या शिक्षण व्यवस्थेतील खरा
‘विवेकानंद’चे पाच विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण कोल्हापूर : विवेकानंद कॉलेजमध्ये सुरू असलेल्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे सेट/नेट मार्गदर्शन केंद्राचे ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयाचे विद्यार्थी अभिजीत संभाजीराव कदम, मनिषा पोवार, अरुण पुकले, सरदार निवृत्ती पाटील व सुधीर रामचंद्र माळी हे पाच विद्यार्थी एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language